नवीन पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल परिसरातील सांगटोळी नेरे येथे राहणारे व ठाणे येथील एका कॉलेजमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करणारे व त्यांचे १७ सहकारी दरवर्षीप्रमाणे केदारनाथ येथे जाण्यासाठी गुगलवरील हिमालयीन हेलीकॉप्टर सर्व्हिसेस यांना बुकिंगचे पैसे ऑनलाईन पाठविण्यात आले. बुकिंगच्या नावाने सुरु केलेल्या भामट्यानी पैसे घेतले मात्र बुकिंग करून दिले नाही. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
धनंजय विठ्ठलराव राख (५३, राहणार सांगटोली, नेरे) हे ठाणे येथील कॉलेजमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. राख हे दरवर्षी आपल्या सहकाऱ्यांसोबत केदारनाथ येथे जात असतात. यावेळी यावर्षीसुद्धा राख हे त्यांचे १७ सहकारी यांच्या सोबत जाण्यासाठी हेलिकॅप्टर बुकिंगच्या शोधात होते. यावेळी राख हे गुगलवर ऑनलाईन शोधत असताना त्यांना हिमालयीन हेलीकप्टर सर्व्हिसेस ची माहिती घेतली त्यावरील असलेल्या आकाश सिंग या व्यक्तीचा नंबर दिला होता.
यावेळी राख यांनी त्या नंबर संपर्क करून माहिती घेतली. व शिरसी ते केदारनाथ बुकिंग पाहिजे असल्याचे सांगितले त्यावर सिंग याने एका व्यक्तीचे ४६८० रुपये असे दोन्ही बाजूकडून सर्वांचे एकुण ७९५६० रुपये होतील असे सांगितले. यावेळी राख यांनी ऑनलाईन द्वारे दोन टप्प्यात पैसे पाठविले.
मात्र आकाश सिंग याने पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. व तिकीट दिलीच नाही. यावेळी राख यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, यावेळी त्यांनी तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकारची माहिती दिली. व पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.