मुंबई (प्रतिनिधी) : भाजप प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मविआ सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले आहे. “काय शोकांतिका आहे,… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहेत.
तरीही मंत्री आहेत आणि जेलमध्ये बसून मंत्रिमंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक यांचा निर्णय जाहीर केलाय.” अशी पोस्ट निलेश राणे यांनी फोटो ट्वीट करत केली आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्याने निलेश राणे यांनी टीका केली आहे. मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे.
गुरुवारी मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला होता. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा मंत्रिमंडळ
निर्णय आहे.