Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

धुळ्यानंतर आता नांदेडमध्ये तलवारींचा साठा जप्त

धुळ्यानंतर आता नांदेडमध्ये तलवारींचा साठा जप्त

नांदेड : धुळ्यात तलवारींचा साठा जप्त केल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरुन भाजपने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्याच दरम्यान आता नांदेड मध्ये तलवारींचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
नांदेडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रिक्षातून नेण्यात येणारा तलवारींचा साठा जप्त केला आहे. त्यासोबतच एका आरोपीला अटक सुद्धा केली आहे.


नांदेड शहरातील गोकुळनगर भागातुन ऑटोतुन शस्त्रसाठा नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी ऑटोची तपासणी केली. त्यावेळी २५ तलवारी आढळून आल्या. या प्रकरणी आकाश गोटकवाड याला पोलिसांनी अटक केली. विक्रीच्या उद्देशाने तलवारी आणल्याची कबूली त्याने दिली आहे.


अमृतसर पंजाबहून रेल्वेत पार्सल करून तलवारी नांदेडला आणल्याचे आरोपी आकाश याने सांगितले. यात आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment