चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील चार युवक कोळकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले असता कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा त्यांना अंदाज न आल्याने ते चोघेही बुडत असताना येथील धनगर बांधवांनी त्यांना बघितले व त्यातील दोघांना वाचवण्यात या धनगर बांधवांना यश आले. मात्र यातील दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यात अलोरे सोमेश्वर मंदिर नजीक राहणारा सुजय संजय गावठे व त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर यांचा समावेश आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान बेपत्ता सुजय गावठे, ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर सोबत शाहीन कुट्टीनो, रुद्र जंगम आणि त्यांच्यासोबत असलेला कुत्रा असे कोळकेवाडी टप्पा चारनजीक कालव्याच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा नेमका अंदाज त्यांना न आल्याने ही दुर्घटना घडली. पाण्यात बुडत असतांना त्यांनी आरडाओरड सुरू केली त्यातून लगतच काम करत असलेल्या धनगरांनी ही आरडाओरड ऐकून दुर्घटनास्थळी धाव घेतली.
रुद्र आणि शाहीन यांना बाहेर काढण्यात या धनगर बांधवांना यश मिळाले. यावेळी सुजय गावठे हा देखील पाण्याबाहेर येत होता. मात्र ऐश्वर्या खांडेकर बुडत असल्याचे बघून तो तिला वाचवण्यासाठी पुन्हा पाण्यात गेला. त्यानंतर ते दोघेही बेपत्ता झाले. अलोरे पंचक्रोशीतील जि. प. सदस्य विनोद झगडे, तुषार चव्हाण, प्रमोद महाजन, घन:श्याम पालांडे, प्रकाश आंब्रे आणि अनेक युवा कार्यकर्त्यांनी कोळकेवाडी धरण परिसराकडे धाव घेतली. त्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली.
अलोरे शिरगाव पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाहणी केली व बेपत्ता असलेल्या दोघांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र रात्रीचा अंधार पसरल्यामुळे बचावकार्य सायंकाळी ७.३०च्या दरम्यान थांबवण्यात आले. या घटनेनंतर अलोरे परिसरात शोककळा पसरली आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…