मोरवंडे परिसरात बिबट्याची दहशत

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोरवंडे गावाच्या हद्दीत बिबट्याचा मुक्त संचार असून दोन बछड्यांसह रानात फिरणाऱ्या बिबट्या मादीने वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला.


मानवी वस्तीच्या जवळ येऊन बिबट्याने वासरावर हल्ला करत त्याचा फडशा पाडल्याने मोरवंडे गाव परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वासरावर हल्ला करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेली बिबट्या ही मादी असून तिच्यासोबत तिचे दोन बछडेही ग्रामस्थांना आढळू आले आहेत.


मोरवंडे गावाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे येथील शेतकऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आले आहे. पाळीव जनावरे, कुत्रे यांच्यावर बिबट्याने अनेकदा हल्ले केले आहेत. तसेच येथील एका शेतकऱ्यावरही बिबट्याने हल्ला केला होता. तथापि, त्या शेतकऱ्याने त्याला पळवून लावले होते.


दरम्यान, सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असून त्यासाठी शेतामध्ये जावे लागते. तथापि, बिबट्याचा वावर सर्वत्र निदर्शनास येत असल्याने शेतीच्या कामांसाठी रानात कसे जायचे, याची चिंता येथील शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे या बिबट्या व बछड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Comments
Add Comment

पनवेल महानगरपालिकेच्या १४ प्रभागांसाठी फेर सोडत

सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पूर्ण पनवेल : राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशांनुसार नागरिकांचा

मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावर वाहतूक बंदी

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून अधिसूचना जारी अलिबाग (प्रतिनिधी) : मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावरील

रायगड जिल्ह्यात नगरसेवक पदांसाठी ९०० उमेदवारी अर्ज

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी

पेण अर्बन बँकेच्या संचालकांकडून प्रत्येकी २४ कोटींची वसुली?

बँक घोटाळ्यात सहकार आयुक्तांनी निश्चित केली सामूहिक जबाबदारी सुभाष म्हात्रे अलिबाग : पेण अर्बन बँक घोटाळ्यातील

अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

उबाठा गटाचे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा

महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती

राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पद आणि १५ जागा महाड : ऐतिहासिक महाड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी