पालघर (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुधारण्याच्या दृष्टीने गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू असून तो योग आता जुळून आला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महाआरोग्य शिबिरात पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी मुद्दा उचलून धरल्यानंतर एनआरएचएमने पालघरसाठी एक अद्ययावत सामान्य रुग्णालय मंजूर करण्याचे ठरवले. हे जिल्हा सामान्य रुग्णालय देशात प्रथम क्रमांकाचे मॉडेल ठरणार असून २०० खाटांच्या रुग्णालयासाठी २१० कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. नंडोरा येथील दहा एकर जागेत याचे बांधकाम करण्यात येणार असून उर्वरित जागेची मागणी सिडकोकडे करण्यात आल्याची माहिती खासदार राजेंद्र गावीत यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये फायर एनओसी, राज्य पर्यावरण विभागाच्या सचिवांची मंजुरी, सिडकोकडून बांधकामविषयक परवानगी, या कामाला कोकण विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता यांच्याकडून ६ एप्रिल २०२१ रोजी तांत्रिक मंजुरी, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाकडून तांत्रिक मंजुरी, संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रगतिपथावर, १७ टक्के जादा दराने ई-निविदा मंजूर करण्यात आली आहे. गठित समितीमार्फत एल १ निविदेची मान्यता प्राप्त होताच ठेकेदारास कार्यारंभीचे आदेश देण्यात येणार आहेत. वास्तुविशारद डॉ. हिमांशू भूषण यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचे खासदार गावीत म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी खासदार गावीत यांनी एनएचआरएमचे कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक संजय बोडदे यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेत अनेक समस्यांचा ऊहापोह करण्यात आला होता. रुग्णालयासाठी किमान ३० एकर आणि मेडिकल कॉलेजसाठी ४५ एकर जमीन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. असे असताना अगदी कमी जागेमध्ये वास्तू विशारद डॉ. भूषण यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आराखडा बनवला आहे. २०० बेडचे हॉस्पिटल (२१५०६ चौ. मी. क्षेत्रफळ) बरोबरच कर्मचारी वसाहत – १३९१२ चौ. मी. क्षेत्रफळ, जिल्हा हॉस्पिटल प्रशिक्षण केंद्र – १२०० हजार चौ. मी. क्षेत्रफळ, नर्सिंग कॉलेजसाठी – २२०४ चौ. मी. क्षेत्रफळ, नर्सिंग हॉस्टेल्स – २८५७ चौ. मी. क्षेत्रफळ, किचनसाठी – २२५० चौ. मी. क्षेत्रफळ, कॅन्टीन – २५० चौ. मी. क्षेत्रफळ, एमसीएच विंग – १०० बेडसाठी – ८००० चौ. मी. क्षेत्रफळ असे एकूण ५२३३३ चौ. मी. बांधकामाचे क्षेत्रफळ प्रस्तावित आहे.
जी प्लस थ्री इमारत
अत्यावश्यक ओपीडी तळमजल्यावर असून त्याच बाजूला रुग्ण प्रतीक्षालय, कुठेही गर्दी होऊ नये यासाठी मोकळी जागा सोडण्यात आली असून एमरजन्सी रुग्णांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. तळमजल्यावर प्रसूती कक्ष, तर पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर, तिसऱ्या मजल्यावर कार्यालय आणि अंडर ग्राऊंड पार्किंग देण्यात आले आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…