खरीवलीच्या क्रशरविरोधात नागरिकांची तक्रार

  23

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील मौजे खरिवली येथील एका खासगी कंपनीच्या जागेमध्ये इतर तीन कंपन्यांचे क्रशर मशीन चालू आहेत. या क्रशर मशीनसाठी लागणारा दगड ३५ सेक्शन व खासगी वन संपादित असलेल्या जागेमधून काढण्याचे काम दिवस-रात्र चालू आहे. तर सदरच्या जमिनीमध्ये वनेतर कामास बंदी असल्यामुळे २५ ते ३० वर्षांपूर्वी सागवान वृक्षांची लागवड केलेली आहे.


गेल्या पाच वर्षांपासून सलोनी सदर खासगी कंपनीने वन विभागाच्या कोणत्याही परवानगीशिवाय वृक्षतोड केलेली असल्याचा आरोप करत सद्यस्थितीमध्ये दगड उत्खननासाठी पोखलेनच्या सहाय्याने मोठमोठी झाडे उपटून ती मातीमध्ये गाडण्याचे व लाकूड विकण्याचे काम सुरु केले असल्याबाबत लेखी तक्रार दिली.


तसेच सदर कंपनीचे मालक व तिन्ही क्रशर कंपनी यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१ - च, छ) अंतर्गत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी जिजाऊ संघटनेच्या खरीवली शाखेचे अध्यक्ष आझाद अधिकारी, उपाध्यक्ष युवराज भोईर व इतरांनी सह्या करून मुख्य वनरक्षक ठाणे, उपवनरक्षक जव्हार, वनरक्षक वाडा व वनक्षेत्रपाल कांचाड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. संबंधितांवर कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात

खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील