नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी रविवार २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ‘मन की बात ‘ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
मन की बात चा हा ८८ वा भाग असेल. २०२२ वर्षाचा हा चौथा भाग असणार आहे. मन की बात चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांद्वारे, तसेच केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते.
मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.