बंद रस्त्याची माहिती आता गुगल मॅपवर

  21

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील रस्त्यांची पालिकेकडून दुरुस्ती सुरू असल्यास रस्ते बंद केले जातात; मात्र आता या बंद रस्त्यांची माहिती मुंबईकरांना गुगल मॅप वर मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


मुंबई महानगरपालिकेचे जे रस्ते दुरुस्ती कामांसाठी बंद ठेवण्यात येतील, त्यांची माहिती अग्रीम स्वरूपात 'गुगल'ला अधिकृतपणे कळविण्यात येणार आहे. यामुळे 'गुगल मॅप' वर रस्ता शोधतेवेळी रस्ता बंद असल्याचे नागरिकांना सहजपणे कळणार आहे. तसेच बंद असलेल्या रस्त्याला पर्यायी मार्ग देखील 'गुगल मॅप'द्वारे दर्शविला जाणार आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.


दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जे रस्ते विविध दुरुस्ती कामांसाठी किंवा स्थापत्य कामांसाठी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार बंद असतील, त्यांची माहिती महानगरपालिकेद्वारे अधिकृतपणे 'गुगल'ला लेप्टन या संस्थेच्या सहकार्याने कळविण्यात येणार आहे. ही माहिती कळविल्यानंतर त्या पुढील २४ तासांमध्ये ही माहिती 'गुगल मॅप'वर अद्ययावत करण्यात येणार आहे.


या अनुषंगाने चाचणी स्वरुपात दक्षिण मुंबईतील 'गणपतराव कदम मार्ग' येथे सुरू असलेल्या कामांची माहिती 'गुगल'ला कळविण्यात आली होती. ज्यामुळे आता या ठिकाणी लाल रंगातील ठळक ठिपक्यांची रेषा दिसत आहे. या रेषेवर 'क्लिक' केल्यानंतर हा रस्ता बंद असल्याचा कालावधी देखील दिसत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर, आता याच धर्तीवर भविष्यात जे रस्ते बंद असतील, त्यांची माहिती 'गुगल'ला कळविण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा