मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम होते. मात्र उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत दौरा असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेला अडथळा नको, यासाठी आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्धभवू शकतो. त्यामुळे आम्ही अमरावतीला माघारी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मातोश्री आमच्या हृदयात आहे. हिंदूहृदयसम्राट आमच्या मनात आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी चालिसा न वाचणं हे या सरकारचं पाप आहे. आमची मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याची मागणी कायम राहणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने आम्ही आंदोलन मागे घेतल असल्याचे राणांनी सांगितले.