यंदा मार्चमध्ये महागाईत दुप्पटीने वाढ

नवी दिल्ली : देशात महागाई प्रचंड वाढली आहे. इंधनांचे दर गगनाला भिडले आहेत. आता सरकारकडून देखील महागाईचा दर जाहीर करण्यात आला असून मार्च महिन्यात हा दर सर्वाधिक असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात महागाईचा दर दुप्पट झाला आहे.


गेल्या वर्षी मार्चमध्ये वार्षिक महागाईचा दर ७.८९ टक्के होता. यंदा मार्च महिन्यात हाच दर दुप्पट झाला असून १४.५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामागचे कारण देखील केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आला. त्यामुळे कच्चे तेल, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, खनिज तेल, मूलभूत धातू इत्यादींच्या किंमती वाढल्या आहेत. मार्च २०२२ मध्ये महागाईचा दर उच्च आहे, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.


गेल्या दीड महिन्यांपासून युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरू आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा रशिया सर्वात मोठा देश आहे. पण, युद्धामुळे मध्यंतरी पुरवठा साखळी खंडीत झाली होती. तसेच पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. तसेच रशियाच्या कच्च्या तेलावर देखील बंदी घातली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, वायू यांच्या किंमती वाढल्या आहेत. पण, आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ होऊनही निवडणुकीच्या काळात भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. निवडणुका संपल्यानंतर तीन-चार दिवसांनी इंधनाच्या किंमतीमध्ये हळूहळू वाढ होत गेली. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 105.41 रुपये तर प्रति लिटर डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.

Comments
Add Comment

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८