Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीमाटुंग्यातील अपघातामुळे 'लोकल' प्रवाशांचा खोळंबा

माटुंग्यातील अपघातामुळे ‘लोकल’ प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री गदग एक्स्प्रेस आणि चालुक्य एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली होती. मुंबईतील लोकल सेवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज याचा फटका बसला. गदग एक्सप्रेसच्या धडकेमुळे चालुक्य एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले होते. यापैकी दोन डबे पु्न्हा रुळावर आणण्यात यश मिळाले आहे. तर अद्याप एक डबा रूळाच्या खाली आहे. हा डबा पुन्हा रूळावर आणण्यासाठी काही अवधी जाऊ शकतो. परिणामी तोपर्यंत मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

अप जलद मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. सकाळी ८.१०. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणार्‍या काही लोकल आणि सीएसएमटी/दादरकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेस आता अप फास्ट मार्गावर नेल्या जातील. ८.२९ वाजता अप मार्गावरून (२२१०८)लातूर एक्स्प्रेस रवाना झाली आहे. डाऊन जलद वाहतूक भायखळा-माटुंगा मार्गे वळवली जात आहे. तर डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी तीन ते चार तासांचा अवधी लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

दादर-माटुंगा दरम्यान रेल्वे अपघात झाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव उपनगरीय रेल्वेची जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी बंद करण्यात आली होती. धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या पावणे दहा वाजता बंद करण्यात आल्या होत्या. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली होती.

दादर-माटुंगा रेल्वे अपघातामुळे आज, शनिवारी (१६ एप्रिल) मुंबई उपनगरीय रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण / कर्जत/ कसारा) रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -