वसंतदादा बँक घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू

सांगली : गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. चौकशी अधिकारी ॲड. आर. डी. रैनाक यांनी तातडीने दोन सुनावण्या घेऊन महिन्या अखेरीस उलट तपास होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकारी यांची चिंता वाढली आहे.


वसंतदादा बँकेतील घोटाळाप्रकरणी सहकार विभागाकडील एका अपिलवर सुनावणीवेळी २०१८ मध्ये स्थगिती दिली गेली होती. त्यानंतर त्यावर सुनावणी प्रलंबित असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून चौकशी थांबली होती. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करताना सहकारमंत्र्यांसमोर हे अपिल फेटाळण्यात आल्याने बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.


महिन्याअखेरीस उलट तपासणी होण्याची चिन्हे आहेत. अवसायानातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी २७ माजी संचालक, तीन मृत संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर संबंधितांच्या मालमत्ता जप्तीचे आदेशही त्यांनी काढले होते. अंतिम टप्प्यात ही प्रक्रिया आल्यानंतर तत्कालिन सहकारमंत्र्यांनी एका अपिलावर स्थगिती दिली व प्रदीर्घ काळ चौकशी ठप्प होती.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा मंजूर; मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती

- लव्ह जिहाद रोखण्यासाठी 'धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६'वर मंत्रिमंडळाची मोहर मुंबई : बहुप्रतिक्षित धर्मांतर

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष