चेन्नईचे अकाउंट ओपन

नवी मुंबई (प्रतिनिधी) : गतविजेता चेन्नई सुपर किंग्जला अखेर मंगळवारी सूर गवसला. यंदाच्या हंगामातील पाचव्या साखळी लढतीत बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचा २३ धावांनी पराभव करताना त्यांनी गुणांचे खाते उघडले. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यांत चेन्नईने सर्व आघाड्यांवर खेळ उंचावताना पहिला विजय साजरा केला. त्यांच्या विजयामुळे बंगळूरुची सलग तीन विजयांची मालिका खंडित झाली.


मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळूरुची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार फाफ डु प्लेसिस ८ धावा काढून बाद झाला. कर्णधार विराट कोहलीही (१ धाव) जेमतेम खाते उघडू शकला. दुसरा ओपनर अनुज रावतने आक्रमक पवित्रा घेतला तरी १२ धावा काढून परतला. खराब सुरुवातीनंतर आघाडीच्या फळीतील ग्लेन मॅक्सवेलसह (२६ धावा) मधल्या फळीतील शाहबाझ अहमद (४१ धावा) आणि सुयश प्रभुदेसाई यांनी (३४ धावा) थोडा प्रतिकार केला तरी आवश्यक धावा आणि उपलब्ध चेंडू यांच्यातील वाढत्या फरकामुळे बंगळूरु आणि विजय यातील अंतर वाढले. फॉर्मात असलेला यष्टिरक्षक, फलंदाज दिनेश कार्तिकने (१४ चेंडूंत ३४ धावा) छान फटकेबाजी करताना सामन्यात थोडी रंगत आणली. मात्र, त्याची विकेट पडल्याने चेन्नईचा मोठा विजय निश्चित झाला. बंगळुरुची मजल ९ बाद १९३ धावांपर्यंत गेली.



तत्पूर्वी, रॉबिन उथप्पा (५० चेंडूंत ८८ धावा) आणि शिवम दुबेच्या (४६ चेंडूंत नाबाद ९५ धावा) फटकेबाजीमुळे चेन्नईने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २१६ अशी चांगली टोटल फलकावर लावली.
पस्तिशीपार रॉबिनने यंदाच्या हंगामातील दुसरी हाफसेंच्युरी ठोकताना ५० चेंडूंत ८८ धावांची खेळी केली. त्याने ४ चौकारांसह ९ षटकारांची आतषबाजी केली. उथप्पाला शिवमची चांगली साथ लाभली. त्याने ४६ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ९५ धावा फटकावल्या. तिशीतल्या दुबेचे हे १५व्या हंगामातील हे दुसरे अर्धशतक आहे. उथप्पा आणि दुबेने केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही तर तिसऱ्या विकेटसाठी ७४ चेंडूंत १६५ धावांची मोठी भागीदारी केली. या पार्टनरशीपमुळे चेन्नईला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या उभारता आली.


सुपरकिंग्जने दोनशेपार मजल मारली तरी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा बंगळूरू कर्णधार फाफ डु प्लेसिसचा निर्णय गोलंदाजांनी साथ ठरवला. युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सावध सुरुवात केली तरी वेगवान गोलंदाज जोश हॅझ्लेवुडने त्याला १७ धावांवर पायचीत पकडले. त्यानंतर वनडाऊन मोईन अली केवळ ३ धावांवर रनआऊट झाला. सातव्या षटकातील २ बाद ३६ धावा अशा वाईट स्थितीत अनुभवी उथप्पा आणि नवोदित दुबे रॉयल चॅलेंजर्सच्या मदतीला धावून आले. या दुकलीच्या मोठ्या पार्टनरशिपनंतरही कर्णधार रवींद्र जडेजा हा शून्यावर बाद झाला. बंगळूरुतर्फे वहिंदू हसरंगा (२ विकेट) सर्वात यशस्वी बॉलर ठरला.


चेन्नईने यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा दोनशेचा पल्ला गाठला. यापूर्वी, ब्रेबॉर्न स्टेडियमवर गतविजेत्यांनी प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१० धावांची मजल मारली होती. मात्र, लखनऊ सुपर जायंट्सनी ६ विकेट आणि ३ चेंडू राखून लक्ष्य पार केले. परंतु, मंगळवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवरील चेन्नईची विक्रमी धावसंख्या त्यांना यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली.

Comments
Add Comment

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने