Friday, April 18, 2025
Homeमहत्वाची बातमीठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढतच राहणार

ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढतच राहणार

किरीट सोमय्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केला निर्धार

मुंबई : ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. आयएनएस विक्रांतच्या निधीप्रकरणी गुन्हा दाखल असलेले किरीट सोमय्या आहेत कुठे? असा प्रश्न सर्वांना पडलेला असतानाच अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर किरीट सोमय्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. काल (सोमवारी) भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर या व्हिडीओमध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी आरोप केले आहेत, मात्र कोणतेही पुरावे दिले नसल्याचा पुनरुच्चार सोमय्यांनी केला आहे.

सोमय्या म्हणाले की, “मुंबई पोलिसांकडे एकही कागद नाहीये. तक्रारदारांनी सांगितलं की, संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवरुन आम्ही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतजी १७ डिसेंबर २०१३ रोजी ज्यावेळी आपण सगळे राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर राज्यपालांकडेही गेलो होतो. त्यावेळी शिवसेनेते मोठे नेतेही होते. ठाकरे सरकारच्या घोटोळेबाजांविरुद्ध कारवाई होईपर्यंत किरीट सोमय्या मागे हटणार नाही, शांत बसणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -