नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे मालवाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. त्यातून सावरत असतानाच डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. परिणामत: मालवाहतूक करणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर आज, सोमवारपासून मालवाहकतुकीसाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्यात २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याच्या थेट परिणामांमुळे दैनंदिन वस्तू महागणार आहेत.
याबाबत अधिक सांगताना नागपूर ट्रकर्स युनिटीचे प्रमुख कुक्कू मारवाह म्हणाले, ‘डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परिणामत: २५ टक्क्यांनी भाडे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजघडीला शहरात पाच ते सहा हजार ट्रान्स्पोर्टर्स आहेत. त्या सर्वांचा भाडेवाढीला पाठिंबा आहे. याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली आहे.
नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने चारही दिशांना मालवाहतूक होते. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, भोपाळ, इंदूरसह इतरही लहान-मोठी शहरे नागपूरशी जुळलेली आहेत. सध्या नागपूरहून होणाऱ्या दळणवळणाचा विचार करता आंबे, मोसंबी, मिरची, फुलकोबी, कोळसा, लोखंड, लाकूड या उत्पादनांची अधिक प्रमाणात ये-जा होत आहे. मालवाहतुकीचा खर्च वाढल्यास या सर्वांचे दरदेखील वाढणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या कारणांमुळे सुरू असलेल्या अस्थिरतेचा मागील पाच वर्षांपासून सामना करणाऱ्या ट्रान्स्पोर्ट क्षेत्राला कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मागील सत्तर वर्षांपासून ट्रान्स्पोर्टिंगच्या व्यवसायात नागपूरचे स्थान महत्त्वपूर्ण राहिले आहे. बदलत्या काळात मंदावलेली ट्रकची मागणी आणि सातत्याने असलेल्या अस्थिरतेमुळे वाढणारे इंधनाचे दर, याचा दुष्परिणाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…
मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…
महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…
मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली.…