मुंबई (प्रतिनिधी) : पवई येथील आयआयटी स्थानिय लोकाधिकार समितीच्या वतीने अभ्युदय विद्यार्थी संघ व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयआयटी पवई येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात ३१६ जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमास आयआयटी मुंबईचे कुलसचिव भोरकडे व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते. तसेच, महासंघाचे पदाधिकारी वामन भोसले, उमेश नाईक, उल्हास भिले, जाधव, विश्वास राव यांनी या उपक्रमाला भेट देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अरुण मांजरेकर (अध्यक्ष), व प्रमोद भाताडे (सल्लागार) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अशोक कदम (कार्याध्यक्ष), स्वप्नील महाडीक (सरचिटणीस) यांच्या नेतृत्त्वात सर्वश्री राकेश कदम, कुमार वझे, सुधीर भाऊ ढोबळे, कृष्णकांत शिरसाठ, प्रमोद जाधव, चंद्रकांत श्रीवर्धनकर, मंदार गडग, सतीश कुंभार, आबासाहेब मोलावणे, राजेश ठाकूर, हनुमंत सोनार, रमेश दळवी, संतोष शेलार, श्रीनिवास दासरी, संतोष कदम, रवींद्र चिकणे, दिलीप खेडेकर, परशुराम मनगुटकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.