नाले, छोटी गटारे नियमित स्वरूपात स्वच्छ करा

  147

कल्याण (प्रतिनिधी) : कायापालट अभियानांतर्गत महापालिका परिसरातील रस्त्यांची साफसफाई करण्याबरोबरच, येऊ घातलेला पावसाळा लक्षात घेता लहान नाले व छोटी गटारे नियमित स्वरुपात साफ करुन घेणेबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागांच्या सहा. आयुक्त यांना दिले आहेत. त्या आनुषंगाने शुक्रवार सकाळपासूनच १/अ प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मदतीने अंतर्गत नाल्यांची साफसफाई करण्यास सुरुवात केली.


त्याचप्रमाणे ३/क प्रभागातही सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी कल्याण पश्चिम परिसरात आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे व इतरांच्या मदतीने संतोषी माता रोड - सहजानंद चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - महमंद अली चौक – म. फुले चौक तसेच कल्याण स्टेशन परिसर,गावदेवी रोड, लालचौकी रोड, सुभाष नगर रोड, दुध नाका,राममारूती रोड, निक्की नगर, चौधरी मोहल्ला, आधारवाडी चौक, व मेन रोड परिसरातील साफसफाई करून घेतली आणि जोशीबाग परिसरातील ,पंचमुखी परिसरातील तसेच अन्सारी चौक येथील गटारातील गाळ काढून साफ करण्याची कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यायांमार्फत करुन घेतली.


Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री