मुंबई : राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेला ठामपणे विरोध दर्शविणारे मनसेचे नेते वसंत मोरे यांची राज ठाकरे यांनी पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली आहे. मोरे यांच्या जागी आता साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा होती. त्यामुळे राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. हा अंदाज अखेर खरा ठरला आहे.
वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर मनसेच्या गोटात वादळ निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गुरुवारी तातडीने शिवतीर्थवर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना बोलावण्यात आले होते. तर वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. तेव्हाच वसंत मोरे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार, याची कुणकुण लागली होती.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…