
मुंबई : राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेला ठामपणे विरोध दर्शविणारे मनसेचे नेते वसंत मोरे यांची राज ठाकरे यांनी पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी केली आहे. मोरे यांच्या जागी आता साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा होती. त्यामुळे राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. हा अंदाज अखेर खरा ठरला आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1511979354590703618वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर मनसेच्या गोटात वादळ निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गुरुवारी तातडीने शिवतीर्थवर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांना बोलावण्यात आले होते. तर वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. तेव्हाच वसंत मोरे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार, याची कुणकुण लागली होती.