वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार संपावर जाण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अर्थात मेस्मा कायदा लागू केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय (२८ आणि २९ मार्च) संपाची घोषणा केली आहे.


महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी मेस्मा लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य सरकारने राजपत्रात प्रसिद्ध आदेशात म्हटले आहे.


राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही, अशी ठाम भूमिका वेळोवेळी घेतली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांनाही राज्याच्या ऊर्जा विभागाने, राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे. उन्हाळ्यातील वाढलेले तापमान,१० आणि १२ वीच्या परीक्षा,विविध पिकांना पाण्याची असलेली गरज या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पुरवठा मिळावा म्हणून वीज कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचारी यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहनही यानिमित्ताने राज्य शासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला

Heat alert : हवामानाचा लपंडाव : अयोध्येत हुडहुडी तर अकोल्यात लाहीलाही! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट, दुपारनंतर...

महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ज्या राज्यात

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.