Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

आमदारांना मोफत घरे देणे योग्य नाही

आमदारांना मोफत घरे देणे योग्य नाही

मुंबई : आमदारांना मोफत घरं देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर टीकेची झोड उठली आहे. या साऱ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं मत मांडत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शरद पवार यांनी या प्रकारे आमदारांना मोफत घरे देणं योग्य नाही, हा निर्णय चुकीचा असल्याचा त्यांनी निर्वाळा दिला आहे.

केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. शरद पवार यांनी फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांना साठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन ही घरे दिली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय. या निर्णयाबाबत शरद पवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्वत:चं सांगितलं आहे.

Comments
Add Comment