Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडी'धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुले लपवली, अनेक बायकाही लपवल्या'

‘धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुले लपवली, अनेक बायकाही लपवल्या’

नव्या आरोपांमुळे राजकीय खळबळ

कोल्हापूर : राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधीच आता राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकांच्या तोंडावर करुणा मुंडे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा करताच धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

‘धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या. त्यांना पुढे निवडणुकांमध्ये मोठ्या अडचणी येणार आहे’ असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे मुंडेंच्या अडचणी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरंतर, करुणा मुंडे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक लढवण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी एक वेगळा शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, निवडणुकीचा अर्ज भरण्याआधी त्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळीच बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले.

करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी लवकरच मराठीत येणार असून त्याच्यावर सध्या काम सुरू आहे. ‘धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या. त्यामुळे धनंजय मुंडेंना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही’ असाही आरोप यावेळी त्यांनी केला. आता त्यांच्या या आरोमुळे काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -