नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 61 हजार 952 चौरस किलोमीटर वनक्षेत्रापैकी तब्बल 228.81 हेक्टर भागावर अतिक्रमण करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी नुकतीच लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही महिती दिली.
देशात 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रासह एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्यात 61,952 चौरस किलोमीटर इतके नोंदणीकृत जंगल क्षेत्र आहे, असे दिसून आले आहे. यामध्ये 50,865 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील राखीव जंगले, 6,433 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील संरक्षित जंगले आणि 4,654 चौरस किलोमीटर क्षेत्रावरील बिगर वर्गीकृत जंगले यांचा समावेश आहे. बिगर वर्गीकृत जंगलांमध्ये राखीव तसेच संरक्षित जंगलांचा भूभाग वगळता राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या वन विभागाने नोंदणी केलेल्या इतर जंगलांचा समावेश होतो.
आयएफएसआर अर्थात भारतातील वनसंबंधी अहवाल, 2021 नुसार देशात एकूण 7,75,288 चौरस किलोमीटर क्षेत्र वन क्षेत्र म्हणून नोंदणीकृत झालेले आहे.
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…