मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजी विषयाचा शुक्रवारी दुपारच्या सत्रात पेपर घेण्यात आला.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हातात हा पेपर पडल्यानंतर त्यांना धक्का बसला. याचं कारण म्हणजे हा पेपर अगदी जसाच्या तसा नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत आला होता. यामुळे खरेतर चार महिन्यांपूर्वीच हा पेपर फुटला होता हे सिद्ध झाले आहे.
मायक्रोबायोलॉजी या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील संबंधित प्राधापकांना दिली होती. मात्र, प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तरी, तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली असून या संदर्भात विद्यापीठाने घडलेल्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यापीठाच्या वतीने एमबीबीएस (२०१९) द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजी – १ या विषयाची शंभर गुणांची लेखी परीक्षा शुक्रवारी दुपारच्या सत्रात अडीच ते साडेपाच दरम्यान राज्यातील ४१ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेला सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती होती.
विद्यापीठाला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर परीक्षा मंडळाने याची गंभीर दखल घेत बैठक घेण्यात आली. बैठकीत या विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी, या विषयाची फेरपरीक्षा २६ मार्चला सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे, याबाबत लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…