मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अद्यापही सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले तसेच हवाईहल्ले केले जात असल्यामुळे जीवित तसेच वित्तहानी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशाची सुरक्षा तसेच सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीला महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती होती. बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदी महत्त्वाच्या व्यक्ती आजच्या बैठकीला उपस्थित होत्या. बैठकीमधील चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र देशाची सुरक्षा आणि जागतिक पातळीवरील राजकारण यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.


रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष कमी व्हावा यासाठी भारतानेही अनेक प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे समकक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा केली आहे. तसेच प्रत्यक्ष संघर्ष टाळून चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन भारताने या दोन्ही देशांना केलेले आहे. दरम्यान या दोन्ही देशांत युद्ध सुरू झाल्यानंतर नेटोमध्ये सहभागी असलेल्या देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविलेला आहे. रशियाची आर्थिक कोंडी व्हावी यासाठी रशियन तेल तसेच गॅसच्या आयातीवर अमेरिकेने बंदी घातली आहे. भारताने मात्र या युद्धाबाबत सावध भूमिका घेतलेली आहे. संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधात मांडलेल्या ठरावावर भारत तटस्थ राहिलेला आहे.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू