Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीस्वयंप्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा, धाडसीवृत्ती वाढवा

स्वयंप्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा, धाडसीवृत्ती वाढवा

मोदींनी सिम्बॉयसिसच्या विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र

पुणे (प्रतिनिधी) : ‘सिम्बॉयसिसमध्ये राहून तुमच्या प्राध्यापक आणि मित्रांकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाले असेल. पण माझा सल्ला आहे तुम्ही स्वयं प्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा आणि धाडसी वृत्ती सदैव मजबूत बनवा, असा कानमंत्र देतानाच नव्या थीमवर काम करा, नव्या भाषा शिका, सतत नव्याचा शोध घ्या’, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केले. तुम्ही संधीचा फायदा घ्या. तुमचे स्टार्टअप सुरू करा. देशातील समस्यांचे समाधान विद्यापीठातून निघाले पाहिजे. तरुणांच्या डोक्यातून यायला हवे. जसे स्वत:साठी गोल्स सेट करता तसे काही गोल्स देशासाठीही सेट करा, असे आवाहनही मोदींनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सिम्बॉयसिस विद्यापीठात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशासाठी नव्याचा ध्यास घेण्याचं आवाहन केले.

‘या सूवर्ण क्षणाला आरोग्य धामच्या लोकार्पणाची मला संधी मिळाली. मी सिम्बॉयसिसला शुभेच्छा देतो. वसुधैव कुटुंबकमवर या ठिकाणी कोर्स आहेत. ज्ञानाचा प्रसार करण्याची परंपरा आपल्या देशात जिवंत आहे, याचा मला आनंद आहे. येथे ८५ देशांतील ४४ हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. आपली संस्कृती शेअर करत आहेत. म्हणजे भारताची प्राचीन संस्कृती आजही पुढे जात आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांकडे अनेक संधी आहेत. अमर्याद संधी आहेत. जगातील तिसरा सर्वात मोठा हब स्टार्टप इको सिस्टीम आपल्या देशात आहे. स्टार्टअप इंडिया, स्टँडप इंडिया, मेक इंडिया आणि आत्मनिर्भर भारतसारखे मिशन तुमच्या भावनांचे प्रतिनिधित्व करत आहे. आजचा भारत विकसित पावत आहे, असे मोदी म्हणाले.

भारत ग्लोबल लिडर ……

देश आधी आपल्या पायावर उभा राहण्यासाठी ज्या सेक्टरमध्ये विचार करत नव्हता, त्या सेक्टरमध्ये भारत ग्लोबल लिडर बनू पाहत आहे. मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग हे त्याचे उदाहरण आहे. मोबाइल मॅन्युफॅक्चरिंगचा अर्थ केवळ आयात करावा असा होता. डिफेन्स सेक्टरमध्येही दुसरे देश देतील त्यावर आपण अवलंबून राहायचो. आता परिस्थिती बदलली आहे. मोबाइल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश झाला आहे. सात वर्षांपूर्वी देशात केवळ अशा दोन कंपन्या होत्या. आज २०० हून अधिक युनिट्स या कामात गुंतले आहेत. डिफेन्समध्ये जगातील सर्वात मोठा इम्पोर्टर देश होता. आता भारत एक्सपोर्टर देश बनत आहे, असा दावाही त्यांनी केला.

खूप हसा, जोक्स करा, फिट राहा…

‘फिटनेसची काळजी घ्या व खूप हसा. खूप जोक्स करा. खूप फिट राहा. देशाला उंचावर घेऊन जा. जेव्हा आपले गोल्स पर्सनल ग्रोथवरून नॅशनल ग्रोथशी संलग्न होतात तेव्हा राष्ट्र निर्मितीत स्वयंच्या भागीदाराचा अनुभव येतो असे मोदी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -