कल्याण : वाहतूक पोलिसांची ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली अनेकदा काहींना डोकेदुखी ठरत असते. त्याचे ताजे उदाहरण कल्याण शहरात पाहायला मिळाले आहे.
कल्याण पूर्व मलंग रोड द्वारली गावात राहणारे गुरुनाथ चिकणकर या रिक्षा चालकाला ऑनलाईन चलान आले. त्याने अॅपवर तपासून पाहिले असता चक्क हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांचा दंड आकारला आहे.
या प्रकरणामुळे गुरुनाथला मानसिक त्रास झाला आहे. या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी रिक्षा चालकाने केली आहे.