नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी, रविवार २७ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात चा हा ८६ वा भाग असेल. २०२२ वर्षाचा हा दुसरा भाग असणार आहे.
‘मन की बात’ चे थेट प्रसारण नमो आप्लिकेशन, दूरदर्शन, प्रसार भारती आणि आकाशवाणीच्या सर्व प्रदेशिक केंद्रांद्वारे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारच्या विविध सामाजिक माध्यमांद्वारे केले जाते. मुख्य भागाच्या प्रसारणानंतर हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांमध्येही मन की बात चे प्रसारण आयोजित केले जाते.
काही दिवसांपूर्वी जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “रेडिओ हे सकारात्मकता सामायिक करण्याचे तसेच इतरांच्या जीवनात दर्जात्मक बदल घडवून आणण्यात आघाडीवर असलेल्यांना ओळख मिळवून देण्याचे एक उत्तम माध्यम असू शकते याचा मी ‘मन की बात’ मुळे वारंवार प्रत्यय घेतला आहे. या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.”