सिंगल यूज प्लास्टिकच्या 'या' वस्तूंवर बंदी

  82

नवी दिल्ली : सिंगल यूज प्लास्टिक पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. या प्लास्टिक उत्पादनांमुळे पर्यावरणाची दीर्घ हानी होते. हे नुकसान लक्षात घेत ऑगस्ट २०२१ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी त्यावर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यात, १ जुलैपासून अशा सर्व वस्तूंवर बंदी घालण्यास सांगितले गेले होते. याच पार्श्वभूमीवर यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) नोटीस जारी केली आहे. ३० जूनपर्यंत या वस्तूंवर बंदी घालण्याची सर्व तयारी पूर्ण करावी, असे यात सांगण्यात आले आहे.


यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकच्या चमच्यांपासून ते इअरबड्सपर्यंत अनेक वस्तूंवर १ जुलैपासून बंदी घालण्यात येणार आहे.


सीपीसीबीच्या नोटिशीनुसार, १ जुलैपासून प्लास्टिक स्टिक असलेल्या इअरबड, फुग्याला असलेली प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक, आईसक्रिम स्टिक, सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकोल, आदिंचा समावेश आहे. याच बरोबर प्लास्टिक कप, प्लेट, ग्लास, काटा, चमचे, चाकू, स्ट्रॉ आणि ट्रे सारख्या कटलेरी वस्तू, मिठाईचे डिब्ब्यांवर लावले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिकच्या आमंत्रण पत्रिका, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेले पीव्हीसी बॅनर आदींचाही यात समावेश असेल.


महत्वाचे म्हणजे, सीपीसीबीने जारी केलेल्या या नोटिशीत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यात उत्पादन जप्त करणे, पर्यावरणाची हानी केल्याबद्दल दंड आकारणे, तसेच, त्यांच्या उत्पादनाशी संबंधित उद्योग बंद करण्यासारख्या कारवाईचा समावेश आहे.

Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या