भारतात असतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाट्याला आले नसते

बंगळूरू (वृत्तसंस्था): भारतात असतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाट्याला आले नसते, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डेविलियर्सने इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये बोलताना व्यक्त केले.


माझा जन्म भारतात झाला असता तर कदाचित राष्ट्रीय संघात जागा मिळवू शकलो नसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे माझं स्वप्नच राहिले असते, असं डिव्हिलियर्स म्हणतो. भारतीय संघात आपली जागा निर्माण करणं सोपी गोष्ट नसून यासाठी भारतीय खेळाडूंचा आदर केला पाहिजे असंही मत त्याने मांडलं आहे. भारतीय क्रिकेट संघात एखाद्या खेळाडूला आपलं स्थान निर्माण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात राष्ट्रीय संघात जागा मिळवणं खूप मोठं आव्हानच आहे, असे एबीने म्हटले आहे.


गेल्या १५ वर्षांमध्ये आयपीएल क्रिकेट, भारतीय प्रेक्षक आणि भारतीय लोकांच्या काम करण्याची पद्धतीचा मी अनुभव घेतला आहे. भारतात जन्म होणं आणि मोठं होणं थोडं मजेशीर आहे. कोणाला माहित, मी भारतात जन्मलो असतो तर कदाचित राष्ट्रीय संघाकडून खेळू शकलो नसतो. भारतीय संघात सामील होणं खूपच आव्हानात्मक आहे. त्यासाठी तुम्हाला विशेष खेळाडू असावं लागेल, असे डेविलियर्स म्हणाले.


२००८ पासून खेळतोय आयपीएल


एबी डेविलियर्सने आतापर्यंत १८४ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३९.७० च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरनंतर सर्वाधिक धावा करणारा डेविलियर्स हा दुसरा परदेशी क्रिकेटपटू आहे. डेविलियर्स आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच २००८ पासून आयपीएलमध्ये बंगळूरू रॉयल चॅलेंजर्समध्ये (आरसीबी) खेळत आहे. यंदा आरसीबीने त्याला रिलीज केले. पुढील हंगामात डेविलियर्स नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये डेविलियर्स एकमेव परदेशी क्रिकेटपटू आहे.

Comments
Add Comment

६,६,६,६,६- श्रीलंकेविरुद्ध अफगाणच्या या क्रिकेटरने केली कमाल

अबू धाबी: आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील 'करो वा मरो' सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी

नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव

मुंबई: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा नीरज

IND vs PAK : हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला!

मुंबई : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार

India A vs Australia A : ध्रुव जुरेलची कमाल, ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध ठोकले शतक

लखनऊ: ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव

World Athletics Championship: कोण आहे सचिन यादव? ज्याने नीरज चोप्रालाही टाकले मागे

सचिन यादवची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये चमकदार कामगिरी! नवी दिल्ली: भारताचा उदयोन्मुख भालाफेकपटू

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले