एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या आहेत का? - सुधीर मुनगंटीवार

  96

मुंबई : “आम्ही जेलमध्ये गेल्यास तुम्हालाही आत टाकू हे वाक्यच घटनेच्या चौकटीत गांभीर्याने घेतलं पाहिजे. याचा अर्थ आम्ही चुका करतो, तुम्ही दुर्लक्ष करा, आम्ही करतो. देशाच्या स्वातंत्र्याचा मंगलकलश हा गुंडाराजसाठी दिला आहे का? उद्या कोणीही कोणत्या पक्षाचा चुकत असेल तर आमची चौकशी थांबवा, आम्ही तुमची करणार नाही, ही वाटाघाडी जनतेला कशी पटेल? एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या आहेत का?,” अशी विचारणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


“ज्याचं हातावर पोट आहे तो तुमच्यावर विश्वास टाकून मतदानासाठी दोन दोन तास रांगेत उभा राहतो, भारतमाता की जय म्हणतो आणि तुम्ही सौदेबाजी करता. आज महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे. सुडाच्या राजकारणाबद्दल बोलता आणि तुम्ही नारायण राणेंवर गुन्हा दाखल केला. बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसलात आणि आम्हाला तत्वज्ञान देता,” असंही यावेळी ते म्हणाले.


“संजय राऊतांना महाराष्ट्राची जनता गांभीर्याने घेत नाही. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहिती नाहीत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत, पण ज्या पद्धतीने ते भाष्य करतात त्यामुळे ते राज्यसभेचा गौरव वाढवत नाहीत. राज्यसभेच्या सदस्याची उंची कशी नसावी याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे,” अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


“शिवसेनेचा जो दबदबा होता तो आता राहिलेला नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण म्हणणारी शिवेसना आता १०० टक्के राजकारणात गेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यासाठीची ही पत्रकार परिषद होती,” असंही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी