नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेचे सभापती एम व्यंकया नायडू यांनी गायिका आणि सभागृहाच्या माजी सदस्या लता मंगेशकर यांच्या मृत्यूबद्दल शोकप्रस्ताव सादर केला. कामकाज सुरु होण्याआधीच त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यानंतर एका तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी म्हटले आहे की, लता मंगेशकरांच्या जाण्यामुळे देशाचं अतोनात नुकसान झालं असून एक चांगली पार्श्वगायिका देशाने गमावली आहे. त्यांच्या रुपाने भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील एक दयाळू व्यक्ती आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे जणू एका युगाचा अस्त झाला आहे. यामुळे संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरुन न निघण्यासारखी आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…