नवी दिल्ली : पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारत दुर्घटनेत झालेल्या जिवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट संदेशात म्हंटले की, “पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारत दुर्घटनेत झालेल्या जिवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. पिडित कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
पुण्यातील येरवडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. एका इमारतीच्या बेसमेंटसाठी भूमिगत स्लॅबचे काम सुरू असताना वजनदार लोखंडी छत कोसळले. या दुर्घटनेत सात कामगारांना जीव गमवावा लागला. अनेकजण जखमी झाले आहेत.