Saturday, July 5, 2025

गॅस कटरच्या मदतीने स्टेट बँकेचे एटीएम फोडले

गॅस कटरच्या मदतीने स्टेट बँकेचे एटीएम फोडले

अहमदनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव गावच्या शिवारात गुरुवारी रात्री चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. या एटीएममधून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.


रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य करत गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत डीव्हीआर लंपास केल्याचे बँकेच्या शाखेचे शाखाधिकारी कांचन दाभाने यांनी सांगितले.


याप्रकरणी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून घारगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment