पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. एका इमारतीच्या बेसमेंटसाठी भूमिगत स्लॅबचे काम सुरू असताना वजनदार लोखंडी छत कोसळले. या दुर्घटनेत सात कामगारांना जीव गमवावा लागला. अनेकजण जखमी झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी बचावकार्य सुरू होते.
पुण्यातील वाडिया कॉलेजजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. अचानक लोखंडी छत कोसळल्याने त्याखाली काही कामगार अडकले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. काही कामगारांना लोखंडी छताखालून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत ७ कामगारांचा मृत्यू झाला. जखमी कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. रात्री उशीरापर्यंत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. कोसळलेल्या लोखंडी छताखाली आणखी कामगार अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.