शिक्षक पात्रता परीक्षेत ‘महाघोटाळा’

  96

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात आता नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ म्हणजेच टीईटीसाठी (टीचर्स एलिजीबिलीटी टेस्ट) अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याच्या या खुलाशामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


२०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतही मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठवरण्यात आल्याची शक्यता असल्याने या परीक्षांचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तरपास करताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांना देण्यात आलेली माहिती आणि मूळ निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून केली जात आहे. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ जणांना पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निकाल पडताळून पाहिल्यानंतर तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र असल्याचे समोर आले आहे. असे असतानाही या सर्वांना पात्र असल्याचे दाखवण्यात आल्याची माहिती उघड झाली.


२०१३ पासून टीईटीच्या माध्यमातून झालेल्या भरतीमधील शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत का याची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण परिषदेने नुकताच घेतलाय. यासाठी राज्यामधील सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिकांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांना तपासासंदर्भातील आदेश देण्यात आलेत. पुणे सायबर पोलीस सध्या २०१८ आणि २०२० मधील टीईटी घोटाळ्याचा तपास करत आहेत.


तरी या परीक्षेमध्ये २०१३ पासूनच घोटाळा होत असल्याचा आरोप केला जातोय. याच पार्श्वभूमीवर मागील आठ वर्षांचे निकाल आणि प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील १५ दिवसांमध्ये राज्यातील साडेपाच हजार शिक्षकांनी आपली प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडे पाठवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला