नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली.
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला घरी वेगळे केले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. यापूर्वी माझ्या संपर्कात आलेल्यांनी लवकरात लवकर चाचणी करावी. कृपया सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या”, असे हरभजनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले.
हरभजनने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याला भविष्यात पंजाबची सेवा करायची आहे. तेव्हापासून तो राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याने कोणत्याही पक्षात जाण्यास नकार दिला होता.
हरभजन सिंगला कोरोनाची लागण झाल्यामुळे मस्कतमध्ये एक दिवस आधी सुरू झालेल्या लीजंड्स लीग क्रिकेटला मोठा धक्का बसू शकतो. त्याचा इंडिया महाराजास संघात समावेश आहे. मात्र गुरुवारी झालेल्या आशिया लायन्सविरुद्ध तो खेळला नव्हता.