Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई हायकोर्टात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आढळला साप

मुंबई हायकोर्टात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आढळला साप

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप आढळून आला आहे. न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. साप पकडून तो सुरक्षित सोडण्यात आला आहे. आता याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये शुक्रवारी सकाळी साप आढळला. सर्पमित्रांच्या मदतीने हा साप पकडण्यात आला. त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप दिसल्यानतंर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

हायकोर्टात साप कुठून आणि कधी आला याची माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -