Friday, July 19, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदी जगात सर्वात लोकप्रिय नेते

पंतप्रधान मोदी जगात सर्वात लोकप्रिय नेते

जागतिक नेत्यांच्या सर्वेत मोदी पुन्हा १ नंबरवर

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक लोकप्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. (Prime Minister Modi is the most popular leader in the world) जागतिक नेत्यांच्या यादीत अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या शक्तिशाली आणि विकसित देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही मागे टाकत पंतप्रधान मोदींची पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे. या यादीत पंतप्रधान मोदींना ७१ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली आहे, तर त्यांच्यासह इतर जागतिक नेते रेटिंगच्या बाबतीत खूपच मागे आहेत. हे रेटिंग मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जारी केले आहे.

मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रादार हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ६६ टक्के अप्रुवल रेटिंग मिळाली आहे. त्यांच्यानंतर तिसरा क्रमांक इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा आहे. त्यांना ६० टक्के रेटिंग मिळाले आहे.

तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना ४३ टक्के रेटिंग मिळाले असून ते सहाव्या क्रमांकावर आहेत. कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांनाही ४३ टक्के रेटिंग पॉइंट मिळाले आहेत. पण त्यांचा क्रमांक अमेरिकेच्या अध्यक्षांनंतर येतो. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के अप्रुवल रेटिंग मिळाले आहे.

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेच्या यादीत इतर नेत्यांना मागे टाकले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या सर्वेत त्यांची प्रथम क्रमांकावर निवड झाली होती. २०२०च्या तुलनेत मोदींचे रेटिंग अजूनही कमीच आहे. मॉर्निंग कन्सल्टने त्यांच्या मे २०२० च्या अहवालात पंतप्रधान मोदींना ८४ टक्के रेटिंग दिले होते, तर वेबसाइटने मे २०२१ मध्ये त्यांचे रेटिंग ६३ टक्क्यांपर्यंत खाली आणले होते.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स जागतिक स्तरावर सरकारी नेत्यांच्या अप्रुवल रेटिंग आणि देशाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी कार्य करते. ही संस्था ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि यूकेसह १३ देशांचा मागोवा घेते. जागतिक नेत्यांची नवीन अप्रुवल रेटिंग १३ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. ही रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या ७ दिवसांच्या हालचालींच्या सरासरीवर आधारित आहेत.

या सर्वेक्षणामध्ये जगभरातील अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ मोठ्या नेत्यांचा कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

या यादीच्या तळाशी ११ व्या स्थानी ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो, १२ व्या स्थानी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि १३ व्या स्थानी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आहेत. बोल्सोनारो यांना ३७ टक्के, मॅक्रॉन यांना ३४ टक्के तर जॉन्सन यांना अवघी २६ टक्के मतं मिळाली आहे.

कधी करण्यात आले हे सर्वेक्षण?

“सध्या समोर आलेली आकडेवारी ही १३ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान जमा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेली आहे. प्रत्येक देशामध्ये राहणाऱ्या सज्ञान व्यक्तींच्या मुलाखतींमधून ही माहिती जाणून घेतली जाते. ही आकडेवारी दर आठवड्याला अपडेट केली जाते. प्रत्येक देशानुसार सर्वेक्षणाची सॅम्पल साइज वेगवगेळी असते,” असे मॉर्निंग कन्सल्टच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

सर्वेक्षणासाठी वापरलेली पद्धत..

मॉर्निंग कन्सल्टच्या मालकीची पॉलिटिकल इंटेलिजन्स ही निवडणुका, निवडून आलेले उमेदवार आणि मतदानाच्या समस्यांवर रिअल-टाइम पोलिंग डेटा प्रदान करते. मॉर्निंग कन्सल्ट जागतिक स्तरावर ११ हजारहून अधिक मुलाखती घेते आणि अमेरिकेतील ५ हजार नोंदणीकृत मतदारांच्या अध्यक्षीय निवडणुकांबद्दल मुलाखती घेते. तर, भारतात सर्वेक्षणात सहभागी केल्या जाण्याऱ्या लोकांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या जातात. प्रत्येक देशात वय, लिंग, प्रदेश, शिक्षण आणि काही विशिष्ट देशांमध्ये अधिकृत सरकारी स्त्रोतांवर आधारित सर्वेक्षण केले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -