Friday, October 11, 2024
Homeदेशदेशातील कोरोनाबाधितांची संख्या पावणे तीन लाखांच्या उंबरठ्यावर

देशातील कोरोनाबाधितांची संख्या पावणे तीन लाखांच्या उंबरठ्यावर

२४ तासात २,७१,२०२ नवे रुग्ण; ३१४ मृत्यू तर ७,७४३ ओमायक्रॉनबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत वाढ होत असताना कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरू आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनमुळेही चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय तसेच सर्वच राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंधांची देखील अमलबजावणी सुरू आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी देशभरात २४ तासांमध्ये आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही अडीच लाखांपेक्षाही जास्त दिसून आली.

रविवारी (१६ जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे २,७१,२०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांवर पोहोचला आहे.

आज आढळलेली कोरोनाबाधितांची संख्या ही कालच्या रूग्ण संख्येपक्षा २ हजार ३६९ रूग्णांनी जास्त असल्याचे दिसत आहे. याशिवाय, मागील २४ तासात ३१४ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झालेली आहे. १ लाख ३८ हजार ३३१ रूग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत.

देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १५ लाख ५० हजार ३७७ आहे. तर, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा १६.२८ टक्के आहे.

तसेच, देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा ७ हजार ७४३ वर पोहचला आहे. यात महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. गेल्या २४ तासांत ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत २८.१७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -