खेड (प्रतिनिधी) : लाच स्वीकारताना खेड तालुक्यातील भरणे येथील मंडल अधिकारी सचिन गोवळकर यांना १२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर गुरूवार दि. १३ रोजी गोवळकर यांना खेड न्यायालयात हजर केले असता त्यांची २५ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी चौदा हजार रुपयांची लाच स्वीकारताना १२ जानेवारीला भरणे मंडल अधिकारी सचिन यशवंत गोवळकर यांना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भरणे ग्रामपंचायत कार्यालयात अटक केली होती.
खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ वर नावाची नोंद घालून ती मंजूर करून देण्यासाठी सचिन गोवळकर यांनी एका व्यक्तीकडे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत संबंधित व्यक्तीने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीच्या पथकाने १४ हजार रुपये लाच रक्कम ग्रामपंचायत भरणे या इमारतीमधील मंडल अधिकारी कार्यालय येथे स्वीकारताना सचिन गोवळकर यांना रंगेहाथ पकडले होते.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…