चन्नी चमकौर साहिब येथून तर सिद्धू अमृतसर येथून निवडणूक लढणार

विधानसभा निवडणूकीसाठी सत्ताधारी काँग्रेस पार्टीने 86 उम्मीदवारांची यादी जाहीर केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी हे चमकौर साहिब येथून तर नवजोत सिंह सिद्धू अमृतसर पूर्व मधून निवडणूक लढवणार आहेत.  सोनू सूदची बहिण मालविका सूद मोगा येथून निवडणूक लढवणार आहे. तर कादियानमधून प्रताप सिंह बाजवा आणि मानसा या मतदारसंघातून गायक सिद्धू मूसेवाला निवडणूक लढवणार आहेत. सुजानपूर मतदारसंघातून नरेश पुरी, पठानकोटमधून अमित विज, गुरदासपूर येथे बरिंदरजीत सिंह पहरा यांना काँग्रेस पक्षाने तिकिट दिले आहे.

पंजाबमध्ये 117 जागांवर एकाच टप्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंजाबमध्ये  विधानसभाच्या 117 जागा आहेत. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ  27 मार्च 2022 रोजी संपणार आहे.  14 फेब्रुवारी 2022 रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकता येईल. 29 जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होईल. 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल.
Comments
Add Comment

नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह

श्रीहरिकोटा : भारतीय नौदलाठी इस्रोने LVM3-M5/CMS-03 या रॉकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे

बाजारात अजूनही दोन हजार रूपयांच्या नोटा, RBI ने दिली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा २०००च्या नोटा चर्चेचा विषय ठरत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नुकताच

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,