नवीन पनवेल (प्रतिनिधी) : कर्नाळा अभयारण्या समोर रस्त्यावरच्या स्पीडब्रेकरमुळे एकाचा जीव गेला आहे. ज्ञानेश्वर पाटील असे मृत इसमाचे नाव आहे. अपघातांना आमंत्रण देणारे हे स्पीड ब्रेकर काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. ज्ञानेश्वर पाटील हे त्यांचे मित्र सौरभ भोजनी यांच्यासोबत मुंबई-गोवा महामार्ग येथून दुचाकीवरून जात होते. त्यांची गाडी कर्नाळा अभयारण्य परिसरात आली असता पुढे असणाऱ्या गाडीने स्पीड ब्रेकर मुळे ब्रेक दाबला. त्यामूळे सौरभ यांच्या दुचाकीने पुढे जाणाऱ्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर पाटील यांचा मृत्यू झाला.
कर्नाळा अभयारण्य येथे टाकण्यात आलेल्या स्पीडब्रेकर मुळेच ज्ञानेश्वर पाटील यांचा मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र हे स्पीडब्रेकर कोणी टाकले याबाबत कोणीही स्पष्ट काही सांगत नाहीत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…