Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीस्पीड ब्रेकर देताहेत अपघातांना आमंत्रण; एकाचा मृत्यू

स्पीड ब्रेकर देताहेत अपघातांना आमंत्रण; एकाचा मृत्यू

नवीन पनवेल (प्रतिनिधी) : कर्नाळा अभयारण्या समोर रस्त्यावरच्या स्पीडब्रेकरमुळे एकाचा जीव गेला आहे. ज्ञानेश्वर पाटील असे मृत इसमाचे नाव आहे. अपघातांना आमंत्रण देणारे हे स्पीड ब्रेकर काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. ज्ञानेश्वर पाटील हे त्यांचे मित्र सौरभ भोजनी यांच्यासोबत मुंबई-गोवा महामार्ग येथून दुचाकीवरून जात होते. त्यांची गाडी कर्नाळा अभयारण्य परिसरात आली असता पुढे असणाऱ्या गाडीने स्पीड ब्रेकर मुळे ब्रेक दाबला. त्यामूळे सौरभ यांच्या दुचाकीने पुढे जाणाऱ्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर पाटील यांचा मृत्यू झाला.

कर्नाळा अभयारण्य येथे टाकण्यात आलेल्या स्पीडब्रेकर मुळेच ज्ञानेश्वर पाटील यांचा मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. मात्र हे स्पीडब्रेकर कोणी टाकले याबाबत कोणीही स्पष्ट काही सांगत नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -