अंजप येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

नरेश कोळंबे


कर्जत : आता सर्वच ठिकाणी कोरोनाने हाहाकार माजविला असून अनेक लोक पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने तपासणी आणि कोरोना टेस्ट करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. गाव - खेड्यांत अनेक वृद्ध स्त्री आणि पुरुष कधीही आजारपणाची तपासणी करून घेत नाहीत. अशा सर्वांना घरपोच सर्व सोय व्हावी यासाठी समतावादी प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळ अंजप यांच्या वतीने रायगड हॉस्पिटलमधील तज्ज्ञांना घेऊन गावातील व शेजारील गावांतील लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर भरवले होते.

समतावादी प्रतिष्ठान, जय भवानी मित्र मंडळ अंजप आणि रायगड हॉस्पिटल यांच्या वतीने स्व. भास्कर मिणमिणे यांच्या जयंतीनिमित्त नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात लहान बाळांची तपासणी, ईसीजी, ब्लड प्रेशर, मधुमेह, स्त्रियांच्या आजारांवरील तपासणी, सर्व बॉडी चेकअप करण्यात आले. तसेच अत्यंत अल्प दरात महिला आणि पुरुष यांची सोनोग्राफी आणि नेत्र तपासणी करण्यात आली. या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.

सोनोग्राफीसाठी बाहेरील खासगी रुग्णालयापेक्षा निम्म्यापेक्षा कमी पैसे घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी रोशन साळोखे यांनी सर्व लोकांना मोफत औषध वाटप केले. या सर्व आरोग्य शिबिरात गावातील तरुणांनी विशेष भाग घेत अनमोल साथ दिली. त्यात तानाजी मिणमिणे, नरेश मिणमिणे, गुरुनाथ मिणमिणे यांनी हे शिबीर यशस्वी केले. यावेळी १०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी भालचंद्र थोरवे, अभिजित देशमुख, बाजीराव दळवी, रामचंद्र मिणमिणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Add Comment

पुणे मेट्रोचा विस्तार ठरला; विमानतळापर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल नवा मार्ग

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत मेट्रो सेवा आता थेट लोहगाव विमानतळाच्या दारात पोहोचणार आहे.

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला