देशात लॉकडाऊन लागणार नाही

मुंबई : कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचं मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत होते.

कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "केंद्राने राज्यांना 23 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा वापर करुन अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटं लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात."

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार होणं शक्य आहे. त्यामुळे होम आयसोलेशन संबंधी नियमांचे पालन करावं. ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही."

आवश्यक असलेल्या औषधांच्या बाबतीत केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे, सर्व राज्यांकडे लसीचे डोस उपलब्ध आहेत असंही पंतप्रधान म्हणाले.
















































Comments
Add Comment

रेल्वेतून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी ई - बाईक !

रेल्वेची रस्त्यावरही सेवा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर ई-बाईक भाड्याने देण्याची सेवा

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित

काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील

‘मनरेगा’ नव्हे, आता ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेताना

देशात २०२७ मध्ये डिजीटल जनगणना

११ हजार ७१८ कोटी रुपयांची तरतूद दोन टप्प्यांत होणार जनगणना एप्रिल ते डिसेंबर सात महिन्यांचा कालावधी

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत