‘मराठीला आक्षेप नाही, पण शब्दांच्या आकारावरून सक्ती नको’

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातली सर्व दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. यावर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिशनचे अध्यक्ष विरेन शहा म्हणाले, "मराठी भाषेत नाव लिहीण्याविषयी आम्हाला कोणताही आक्षेप नाही. फेडरेशनने २००१ मध्ये एकाच गोष्टीबद्दल आक्षेप घेतला होता, तो म्हणजे मराठी फाँट साईझ इतर भाषांपेक्षा मोठी असावी असे सरकारने तेव्हा सांगितले होते. त्यावर आमचा आक्षेप होता. या मूलभूत हक्कावरून कोर्टाने स्टे दिला होता.

शहा म्हणाले की, २००८ मध्येही राजकीय पक्षांनी हंगामा केला होता. तेव्हाही दुकानांच्या पाट्या तोडण्यात आल्या होत्या. हायकोर्टाने पुन्हा ती स्थगिती कायम ठेवली होती. आजही आमची हीच विनंती आहे. नावाच्या फलकावर मराठी वापरण्याला आमचा काहीही आक्षेप नाही. पण शब्दांच्या आकारावरून आमच्यावर सक्ती करण्यात येऊ नये. मराठीचा आम्ही आदर करतो. प्रत्येक भागात मराठी असायला हवी. मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. इथे लोक वेगवेगळ्या भागातून येतात. त्यामुळे याचा अधिकार दुकानदारांना असायला हवा, असे शहा म्हणाले.


‘हे श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकाचे’


राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पत्र शेअर केले आहे. “या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावे लागून नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलने केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या,” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच,” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
Comments
Add Comment

मिनिटांत पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरमागे किती पैसे मिळतात ? जाणून घ्या वास्तव

मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या