Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

‘जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’अभियान उत्साहात

‘जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’अभियान उत्साहात
तलासरी :‘जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा कवाडा ठाकरपाडा येथे ३ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत पार पडला. या अभियानांतर्गत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या समन्वयाने शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पहिल्या दिवशी प्रभात फेरी व प्रतिमा पूजन आणि अभिवादन, दुसऱ्या दिवशी वेशभूषा, आरोग्य तपासणी शिबिर, मासिक पाळी व्यवस्थापन उदबोधन वर्गाचे आयोजन, निबंध लेखन, आरोग्य सेविकेची मुलाखत, माझी उंची- माझी स्वप्ने विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन, पोवाडा गायन, महिला सक्षमीकरण यावर आधारीत व्याख्यान इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्पर्धेतील सहभागी विद्यार्थीनींना शाळेकडून बक्षिस देण्यात आले.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी झरी केंद्राचे केंद्र प्रमुख प्रधान व गटशिक्षणाधिकारी कमलाकर सुतार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या अभियानाचे पूर्व नियोजन व आयोजनाचे काम शाळेतील शिक्षक बाबू धोधडे, नवीन धोडी, अशोक धोडी यांनी केले, तर प्रत्यक्ष अभियानातील विविध कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळेतील महिला शिक्षिका सुशिला तिरपुडे, गीता गुडपे, मंजुळा शनवार, सपना घरत, ललिता शिंदा व अंकिता धोडी यांचे योगदान लाभले.
Comments
Add Comment