शुक्रवारी ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार हिंदी 'पुष्पा '

हैदराबाद : अभिनेता अल्लू अर्जुनच्या धमाकेदार पुष्पा : दि राईज चित्रपटाचा हिंदी भाग 14 जानेवारीला, (शुक्रवारी) ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.'पुष्पा ' चित्रपटास हिंदीत जोरदार प्रतिसाद लाभला. अल्लू अर्जुनने प्रस्थापित हिंदी चित्रपटांना मागे टाकत अखिल भारतीय स्तरावर ख्याती आणि प्रसिद्धी प्राप्त केली.

अनेक क्षेत्रातील मान्यवर देखील 'पुष्पा 'चे सामाजिक माध्यमांवर कौतुक करीत आहेत. विविध भाषांमधील आघाडीच्या अभिनेत्यांनी, मान्यवरांनी पुष्पा आणि अल्लू अर्जुनचे जाहीर कौतुक केले आहे.

हिंदी 'पुष्पा'साठी श्रेयस तळपदेने अल्लू अर्जुनच्या व्यक्तिमत्वास साजेसा आवाज दिला आहे. अल्लू अर्जुनचे हिंदी भाषेत मोठ्या प्रमाणात चाहते आणि प्रशंसक आहेत. अनेक वर्षांपासून टीव्ही, विविध हिंदी चित्रपट वाहिन्यांवर त्यांच्या तेलुगू चित्रपटाच्या हिंदी भागांद्वारे ते संपूर्ण देशात आधीच प्रसिद्ध होते.

बाहुबलीद्वारे प्रभास, आरआरआरद्वारे रामचरण आणि ज्युनियर एनटीआर प्रमाणेच अल्लू अर्जुन टॉप ५ अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. बाहुबली दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्याप्रमाणेच दिग्दर्शक सुकुमार देखील पुष्पामुळे प्रकाशझोतात आले आहेत. एस एस राजमौली यांच्या सल्ल्यानुसारच पुष्पा हिंदीत प्रस्तुत करण्यात आला.

मागील आठवड्यात पुष्पा तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत इंग्रजी सह-शीर्षकांसह ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. ऍमेझॉन प्राईमवरही चित्रपटास आणि अल्लू अर्जुन यांच्या अभिनयास उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.

पुष्पा : दि राईज नंतर पुष्पा : दि रुल जास्तीत-जास्त भारतीय भाषांमध्ये प्रस्तुत करण्याचा निर्णय अल्लू अर्जुन यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. दुसऱ्या भागाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे.



पुष्पा : दि राईज आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या सीमावर्ती भागात विशेषतः तिरुपती येथील अरण्यात चंदन तस्करी या विषयावर पुष्पराज या मजुराची आणि त्याने निर्माण केलेल्या साम्राज्याची एक काल्पनिक कथा आहे.
Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय